Sukh Kalale Ajay-Atul Lyrics

Album Name Ved
Artist Ajay-Atul
Track Name Sukh Kalale
Music Ajay-Atul, Shreya Ghoshal
Label Warner Music India
Release Year 2022
Duration 05:39
Release Date 2022-12-20

Sukh Kalale Lyrics

करून अर्पण तुला समर्पण
घरात घरपण मी आज पाहिले मी पाहिले
ऋणानुबंधात गीत गंधात
मि आनंदात आज गायिले मी गायिले
दिस वाटे वेगळा अन लागे का लळा
हे वेडे मन माझे पुरतेच भाळले

सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले मन जुळले

अंतरंगाने देहअंगाने स्पर्श केला अन वाटे स्वर्गच आला हाताला
स्वप्न जे होते पूर्ण ते झाले मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
वचनांचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी अर्धांगि समजूनी संपूर्ण पाळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले मन जुळले
प्रार्थना होती सात जन्माची
भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
पूर्तता झाली सोनपायाने
आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला
जन्मांचे बंध हे प्रीतीचे गंध हे
तू एका गजरयाने केसात माळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सुख कळले कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले मन जुळले

Related Posts