Album Name | Basant Bahar |
Artist | Various Artists |
Track Name | Jinku Kinva Maru |
Music | Vasant Desai |
Label | Saregama |
Release Year | 1951 |
Duration | 03:20 |
Release Date | 1951-12-31 |
Jinku Kinva Maru Lyrics
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा, देश आमुचा शिवरायाचा
झाँशीवाल्या रणराणीचा, झाँशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
हानी होवो किती ही भयंकर, हानी होवो किती ही भयंकर
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू