Aali Diwali Aali Diwali Various Artists Lyrics

Album Name Sonyachi Pavoole Aali Majhya Ghari
Artist Various Artists
Track Name Aali Diwali Aali Diwali
Music Vasant Prabhu
Label Saregama
Release Year 1951
Duration 03:25
Release Date 1951-12-31

Aali Diwali Aali Diwali Lyrics

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी

चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी
हार तोरणे गजरे माळा लौकरी
चला, चला, फुले आणा, आनंद झाला घरोघरी

रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरू या
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा, आनंद झाला घरोघरी

अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी!
चला चला पहा तरी, आनंद झाला घरोघरी

हाति सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी
आणा आणा निरांजना, आनंद झाला घरोघरी

Related Posts